अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- अहमदनगर शहरात सक्कर चौक ते स्टेट बँक चौक नगर-पुणे महामार्गावर उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. जे काम चालू आहे त्याच्या दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी जागा आहे. मात्र ही जागा कमी रुंदीची असल्याने व रस्त्यावर खड्डे देखील जास्त प्रमाणात झालेले आहे.
संपूर्ण रस्त्यावर पावसाने चिखल साचले आहेत. या रस्त्याने जाताना व येताना कोणीही मोठ्या वाहनांना ओव्हरटेक करणे धोक्याचे ठरत असूनगाडीचा वेग कमी ठेवणे आवश्यक आहे.
गेल्या काही दिवसांत या रस्त्यावर नियमित वाहन घसरणे, रुतणे, पडल्यामुळे मार लागणे या घटना घडत आहेत. नुकतेच या रस्त्यावर एका तरुण व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
त्यामुळे या रस्त्याने जपून गाडी चालवा किंवा शक्य असल्यास हा रस्ता किमान दुचाकीसाठी तरी नागरिकांनी बंद ठेवावा जेणेकरून कोणतीही दुर्घटना होणार नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उजागरे यांनी म्हंटले आहे.