परिस्थितीपुढे न डगमगणारे नगरकर कोरोनाची दुसरी लाट देखील थोपावून लावणार -आ.संग्राम जगताप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- घर घर लंगर सेवा, महापालिका, लायन्स क्लब व पोलीस दलाच्या वतीने हॉटेल नटराज व जैन पितळे वसतीगृह येथे सुरु करण्यात आलेल्या शहरातील गुरु अर्जुनदेव कोविड सेंटरमध्ये आरोग्याची गुढी उभारुन कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवर विजय मिळवण्याचा संकल्प करण्यात आला.

गुढी पाडवा, बैसाखी व चेतीचंद या सण, उत्सवाच्या काळात घरापासून लांब असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांचे मनोबळ वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

रुग्णांची सेवा करणार्‍या डॉक्टर, परिचारिका यांचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रातनिधीक स्वरुपात सन्मान करण्यात आला.

यावेळी मनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, प्रकाश भागानगरे, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, महापालिका कोरोना दक्षता पथक प्रमुख शशिकांत नजान, सहाय्यक सूर्यभान देवघडे,

प्रितपालसिंह धुप्पाड, किशोर मुनोत, राजेंद्र कंत्रोड, सतीश गंभीर, करण धुप्पड, राजा नारंग, गोविंद खुराणा, नारायण अरोरा, राहुल शर्मा, कैलाश नवलानी, प्रमोद पंतम, पुरुषोत्तम बेट्टी, मनप्रीत धुप्पड,

सनी वधवा, जय रंगलानी, राहुल शर्मा, सुनील थोरात, सिमर वधवा, डॉ. योगेश तांबे आदिंसह कोविड सेंटरचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे.

नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असून, जिल्हा बाहेरील रुग्णांना देखील शहरात आरोग्य सुविधा दिल्या जात आहे. घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम करण्यात आले.

या महामारीत जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता घर घर लंगरसेवेचे सर्व सदस्यांनी लाखो गरजूंची भुक भागविण्याचे कार्य तर कोविड सेंटरच्या माध्यमातून योगदान दिले. त्यांच्या सामाजिक कार्याला अभिमानाचा सलाम आहे.

परिस्थितीपुढे न डगमगणारे नगरकर कोरोनाची दुसरीलाट देखील थोपावून लावणार असल्याची आशा व्यक्त करुन, त्यांनी नियम पाळून स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले.

अविनाश घुले यांनी सर्व रुग्णांना पाडव्याच्या शुभेच्छा देऊन सर्वांना उत्तम आरोग्य लाभून घरी परतण्यासाठी प्रार्थना केली.

हरजितसिंह वधवा यांनी मागील वर्षीपासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुकारण्यात आलेल्या टाळेबंदीच्या पहिला दिवसापासून घर घर लंगर सेवेचे कार्य सुरु आहे.

मागील वर्षी देखील कोविड सेंटरच्या माध्यमातून सेवा देण्यात आली. सध्या मोठ्या संख्येने रुग्णांची संख्या वाढत असताना पुन्हा लंगर सेवा कोरोनाशी लढण्यासाठी व सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी सज्ज झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना रुग्णांनी देखील कोविड सेंटरमध्ये घराप्रमाणे व्यवस्था करण्यात आली असून, कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे काळजी घेतली जात असल्याची भावना व्यक्त केली. फिजीकल डिस्टन्स व नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम घेण्यात आला.

गोविंदपुरा येथील गुरुद्वाराभाई दयासिंहजीच्या वतीने कोविड सेंटरमध्ये मिष्टान्न भोजनचे लंगर देण्यात आले.

यामध्ये रवींद्र नारंग, अमरजीतसिंह वधवा, हविंदर नारंर, मनप्रीतसिंह धुप्पड, हितेश कुमार, मोनू अरोरा यांनी सेवेत सहभाग नोंदवला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24