नगरकरांना मास्कचा विसर;म्हणजे तिसऱ्या लाटेला आमंत्रण..!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- नाशिक विभागामध्ये जळगाव, नंदुरबार, धुळे हे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. याचबरोबर नगर शहरही कोरोनामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने विविध उपाययोजना राबवाव्यात जेणेकरुन कोविड झिरो मिशन होईल.

ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये रुग्णसंख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. या दृष्टीकोनातुन कोरोना रुग्णांच्या संपर्कातील सुमारे ५० नागरिकांची तपासणी करणे गरजेचे आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण परस्पर होम आयसोलेशनमध्ये उपचार घेतात त्यामुळे रुग्णांची संख्या वाढण्यास मदत होते. त्यामुळे ते बंद करण्यात यावेत.

जो रुग्ण ऐकणार नाही त्याच्यावर तात्काळ कारवाई करा. खाजगी हॉस्पटलने रुग्णांचा डाटा महानगरपालिकेकडे नियमितपणे द्यावा. नगर शहरामध्ये मास्क लावण्याचे प्रमाण मोठया प्रमाणात कमी झालेले आहे हे तिसऱ्या लाटेचे आमंत्रण आहे. महानगरपालिकेने विविध पथके तयार करुन मास्क लावण्यासाठी नागरिकांना परावृत्त करावे.

वेळप्रसंगी त्यांच्याकडुन दंड आकारावा याचबरोबर शहरामध्ये लसीकरण केंद्रे वाढवून नागरिकांचे लवकरात लवकर दोनही डोस पूर्ण करावेत असे आदेश महानगरपालिका प्रशासनास नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले. महानगरपालिकेत कोविड व साथीच्या रोगा संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

गमे पुढे म्हणाले की, कोविड या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कोरोना टेस्टची संख्या वाढवा, गर्दीच्या ठिकाणी जाउन टेस्ट करा, लसीकरण पुर्ण करण्यासाठी सामाजिक संस्था, गणेश मंडळ, स्थानिक नगरसेवक यांना विश्वासात घेवून प्रभागामध्ये लसीकरणाची मोहिम मोठया प्रमाणात राबवा.

लसीची कमतरता होवू देणार नाही, महानगरपालिकेने लवकरात लवकर ऑक्सिजन प्लँट उभारावा, यामध्ये कोविडच्या विविध उपाययोजांमध्ये खाजगी हॉस्पिटलांना सामावून घ्या, जो कोणी ऐकणार नाही त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करुन गुन्हे दाखल करा.

कोरोनाच्या मोहिमेमध्ये पोलिस यंत्रणेला सामावून घ्या, जेणेकरुन नागरिकांवर वचक बसेल व नागरिक नियमांचे काटेकोरपणे पालन करतील. याचबरोबर ज्या भागामध्ये ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास कॅन्टोनमेट झोन करा व कोरोना झिरो मिशन होण्यास मदत होईल.