मुंबई कृषी उत्पन्न फळ बजार समितीत नागपूरच्या गोड संत्र्याला जास्त पसंती !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Market Committee: मुंबई कृषी उत्पन्न फळ बजार समितीत नोव्हेंबर महिन्यापासून गावठी मोसंबी व संत्री या फळांचा हंगाम सुरू होतो. बाजारात सध्या २५५९ क्विंटल संत्री, तर १६०० क्विंटल मोसंबी दाखल झाली आहे.

यंदा अवकाळी पावसाचा संत्र्यांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक फळबाजारात फळांची आवक वाढू लागली आहे. बाजारात सध्या नागपूरची गोड संत्री दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे.

त्यामुळे ग्राहक चेन्नईच्या आंबट मोसंबीपेक्षा नागपूरच्या गोड संत्र्याला जास्त पसंती देताना दिसत आहेत. ऑक्टोबर महिन्यात फळधारणा झालेल्या संत्राच्या पिकाला पावसामुळे २० ते २५ टक्के फटका बसला आहे.

एपीएमसीत मागील वर्षी यादरम्यान २५-३० गाड्या दाखल झाल्या होत्या, मात्र आता २०-२५ गाड्या दाखल होत आहेत. एपीएमसीमध्ये सर्व हंगामात चेन्नईची मोसंबी जास्त प्रमाणात उपलब्ध असते. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत थोड्या प्रमाणात नागपूर, अमरावती, जालनाची गोड संत्री दाखल होण्यास सुरुवात होते.

चेन्नईची मोसंबी ही आकाराने मोठी व चवीला आंबट असते. अशी मोसंबी जास्तीस्त जास्त रसाकरता वापरली जाते. मात्र नागपूरची गोड संत्री नागरिक आवडीने खातात;

परंतु ग्राहकांच्या मागणीनुसार बाजारात गोड संत्र्यांची आवक कमी प्रमाणातच होत असते. बाजारात नागूपरची मोसंबी दाखल होताच त्या मालाचा उठाव लगेच होतो. अमरावती आणि विदर्भातून येणारे संत्र आकाराने मोठे व अधिक गोड असते. घाऊक बाजारात संत्रीच्या ८ डझनला पेटी ९०० ते १२०० रुपये दर आहे.