नागवडेंनी शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त करण्याचे पाप करू नये..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- नागवडे कारखाण्याचे विद्यमान चेअरमन यांचा सध्या मनमानी कारभार चालू आहे. ऊस गाळपास आल्यानंतर १५ दिवसांत FRP प्रमाणे पेमेंट अदा करावे न केल्यास पुढील दिवसांचे व्याज द्यावे, असा शासन नियम असताना, शेतकऱ्यांचा ऊस जाऊन सहा ते सात महिने झाले तरी अद्याप FRP प्रमाणे राहिलेले ५६१ रुपये प्रती टन पेमेंट कारखाण्याने दिलेले नाही.

त्यामुळे त्यांनी राहिलेले पेमेंट देताना ते व्याजासह द्यावे अशी मागणी कारखाण्याचे संचालक केशवभाऊ मगर यांनी केली आहे. नागवडे कारखाण्याने शेअर्सची रक्कम वाढवण्यासाठी २४-०६-२०२१ रोजी दुपारी २.०० वा. ऑनलाईन पद्धतीने विशेष सर्वसाधारण सभा आयोजीत केली आहे. कारखाण्याच्या नियमाप्रमाणे सभेची नोटीस किमान १० दिवस अगोदर मिळणे आवश्यक असताना २२-०६-२०२१ पर्यंत एकाही सभासदाला नोटीस मिळालेली नाही.

त्यामुळे त्यांना सभेत आपला सहभाग नोंदविता येणार नाही. शासनाने दिनांक १८-०५-२०२१ ला परिपत्रक काढले असून त्यात असा उल्लेख आहे कि, ज्या कारखाण्यांना विस्तार वाढ करायची असेल, नविन आसवानी प्रकल्प उभारायचा असेल, किंवा इथेनॉल निर्मिती करायची असेल व ज्या कारखान्याचे नक्त मुल्य (NDR) उणे असेल

अशा कारखान्यांनी शेअर्सची किमत १०,००० वरून १५,००० रु. करावी.यातील कोणताही प्रस्ताव नागवडे कारखान्याने केलेला नाही. फक्त इथेनॉल चा प्रस्ताव आहे परंतु त्या करिता ADCC बँकेने १५ कोटी कर्ज दिले आहे. मग शेअर्सची रक्कम वाढवण्याची एवढी घाई राजेंद्र नागवडेंना का झाली आहे ? असा सवाल मगर यांनी उपस्थित केला आहे.

मागील दोन महिन्यांपूर्वी कोरोंना चे संकट असताना देखील ५ ते १० हजार शेतकऱ्याकडून कारखाण्याने १०,१०० रु. प्रमाणे शेअर्स पोटी भरून घेतले, पैसे जमा करण्यासाठी ज्या तत्परतेने सर्व यंत्रणा कामाला लावली गेली तीच तत्परता त्यांना सभासद करण्यासाठी का दाखवली गेली नाही.

तसेच १५ वर्षांपासून सभासदांच्या १४ कोटीच्या ठेवी कारखाण्याकडे पडून आहेत आज रोजी त्याचे निव्वळ व्याज २० कोटी रु. पर्यंत झाले असून सदर व्याजाची रक्कम सभासदांना त्वरित मिळावी अशी मागणी मगर यांनी केली आहे. गेली दिड वर्षापासुन कोरोना महामारीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून तो मानसिक व आर्थिक दृष्टीने खचुन गेला आहे.

अशा अवस्थेत कारखान्याने सभासद शेतकर्यांवर हा आर्थिक वाढीव बोजा टाकू नये. राज्यातील व जिल्ह्यातील एकाही कारखाण्याने ऑनलाईन सभा घेऊन शेअर्सची रक्कम वाढवल्याचे एकही उदाहरण नसताना नागवडे पैसे गोळा करण्याची एवढी घाई का करत आहेत ? असा सवाल मगर यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कारखाना प्रशासनाला विचारला आहे.

या सर्व बाबी लक्षात घेऊन कारखान्याने उद्याची होणारी विशेष सर्वसाधारण सभा स्थगित करून कोरोना संपल्यानंतर कारखाना कार्यस्थळावर खुली सर्वसाधारण सभा आयोजित करून शेअर्स वाढीच्या मुद्यावर चर्चा करावी.

जाहिरात : खरेदी करा 5G स्मार्टफोन अगदी स्वस्तात खालील लिंक्स वरून 

अहमदनगर लाईव्ह 24