ताज्या बातम्या

नमो नमो श्री शंकरा…महाशिवरात्रीच्या पुजेची वेळ, महत्त्व, प्रथा आणि विधी जाणून घ्या

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- यंदा फाल्गुन मासातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीची महाशिवरात्री मंगळवारी 1 मार्च रोजी साजरी होणार आहे. भगवान शंकराच्या भक्तांसाठी हा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नाही.

महाशिवरात्रीच्या अनेक दंतकथा असल्या तरी महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी महत्त्वाचा असतो. एका मान्यतेनुसार या दिवशी महादेवांनी शिवलिंगाचे रुप धारण केले होते.

महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री १२ ते ३ या प्रहरात महादेवांचा जागर केला जातो. शंकराला बेलपत्र, रुद्राक्ष प्रिय आहेत म्हणून ते अर्पण केले जातात.

या दिवशी शंकरांच्या पिंडीवर अभिषेक केला जातो. बेलपत्र पांढरी फुले, धोत्रा, आंबा यांची पत्री आणि भस्म अर्पण केला जातो. काही ठिकाणी गंगाजलाचा अभिषेकही केला जातो.

महाशिवरात्री 2022 पूजा पद्धत आणि शुभ वेळ जाणून घ्या.
महाशिवरात्री 2022, पूजा मुहूर्त, पारणची वेळ जाणून घ्या
महाशिवरात्री 1 मार्च रोजी पहाटे 3.16 पासून सुरू होईल आणि 2 मार्च रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत चालेल.
पहिल्या प्रहारचा मुहूर्त – 1 मार्च हा संध्याकाळी 6.21 ते रात्री 9.27 पर्यंत आहे.
दुसऱ्या प्रहारचा मुहूर्त-: 1 मार्च रात्री 9.27 ते 12.33 पर्यंत आहे.
तिसऱ्या प्रहारचा मुहूर्त-: 1 मार्च हा दुपारी 12.33 ते पहाटे 3.39 पर्यंत आहे.
चतुर्थ प्रहारचा मुहूर्त-: 2 मार्च हा पहाटे 3.39 ते पहाटे 6.45 पर्यंत आहे.
पारणाची वेळ-: 2 मार्च रोजी सकाळी 6.45 नंतर आहे.

Ahmednagarlive24 Office