अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार माझ्यावर पाळत ठेवून आहेत असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
जेव्हा उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागा असा आदेश देतात तेव्हा चालते आणि जेव्हा मी स्वबळाची भाषा करतो तेव्हा त्यांना त्रास होतो. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत.
मात्र एक दिवस या पुण्याचा पालकमंत्री काँग्रेसचा होणार, असे भाकीतही पटोले यांनी व्यक्त केले. सोनिया गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसची भूमी असल्याचं सांगितलं आहे. आपल्याला सत्ता आणायची आहे.
मी त्यांना आश्वासन देऊन आलो आहे असं नाना पटोले यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आणायचा मानस मी केला आहे. कोणीही घाबरण्याचं कारण नाही. दरम्यान, मी बोललो तर बोललो माझी माघार नाही.
स्वबळावर लढाईसाठी तयारीला लागा, असे आवाहनही पटोलेंनी कार्यकर्त्यांना केले. कमिटीवर राहायचं असेल तर पालकमंत्र्यांची सही लागते.
हा जो त्रास पालकमंत्री देतात त्या त्रासाला तुम्ही आपली ताकद बनवा आणि काँग्रेसचा पालकमंत्री आणून दाखवा, असा सल्लाही पटोलेंनी कार्यकर्त्यांना दिला.