अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावर चांगलच राजकीय वातावरण तापलं आहे. राणेंविरोधात गुन्हा दाखल झालं असून त्यांच्या अटकेकरता पथक रवाना झालं आहे.
मंगळवारी अगदी सकाळपासून सुरू झालेल्या शिवसेना – नारायण राणे राडा या मुद्यावर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. पुणे, महाड, नाशिकमध्ये नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यासाठी पथकही रवाना झालं आहे.
असं असताना चिपळूणमध्ये नारायण राणेंनी या सगळ्या घडामोडींवर पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. नारायण राणे म्हणाले… शिवसैनिकाला घाबरत नाही… कुठलाही गुन्हा दाखल केला नाही.. चिपळूमध्ये नारायण राणे आहे. दगडफेक करण हे पुरुषर्थ नाही, असं नारायण राणे म्हणाले. माझ्या गुन्हा दाखल झाला मला माहित नाही.
मी गुन्हा केलेला नाही. मी भीक घालत नाही शिवसैनिकांना, अशी प्रतिक्रिया देखील नारायण राणे यांनी दिली आहे. जनाशीर्वाद यात्रा ठरल्याप्रमाणे होणार, असं देखील राणे यावेळी म्हणाले. शिवसेनेच्या आक्रमकतेला आम्ही जुमानत नाही. राणेंनी शिवसेना सोडली त्याच वेळी आक्रमक शिवसेना गेली, असंही यावेळी नारायण राणे यावेळी म्हणाले.
दरम्यान मुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर महाड, पुणे नाशिकमध्ये राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. राणेंचं विधान गंभीर, अटक करून कोर्टासमोर हजर करा, असा आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. रायगड जनआशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या कानशीलात लगावण्याच्या वादग्रस्त वक्तव्यानं युवासेना आक्रमक,
युवासैनिकांना आज जुहूत जमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नारायण राणे आणि शिवसेना संघर्ष वाढणार आहे. नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानं शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याची नारायण राणेंची भाषा चांगलीच भोवली आहे.
महाड, नाशिक, पुणेमध्ये नारायण राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आले आहेत. राणेंचं विधान गंभीर, अटक करून कोर्टासमोर हजर करण्याचे नाशिक पोलिसांचे आदेश देण्यात आले आहेत. राणेंच्या जुहू बंगल्याबाहेर पोलिसांचा ताफा तसेच समर्थकांनी देखील हजेरी लावली आहे.