अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- रोना महामारीमुळे निधन झालेल्यांविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भावूक झाले. ‘विषाणूमुळे आपल्यातून अनेक प्रियजन दूर गेले आहेत.
मी त्यांना श्रद्धांजली देतो आणि त्यांच्या कुटूंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो.’ असे मोदी यांनी म्हटले आहे. देशात एकीकडे रुग्णसंख्या कमी होत असताना रोज चार हजारांहून अधिक कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांसोबत बैठका घेत आहेत. या बैठकीमध्ये ते उपाययोजनांची माहिती घेत आहेत. दरम्यान शुक्रवारी नरेंद्र मोदी एका बैठकीत बोलत होते. यावेळी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा उल्लेख करताना ते भावूक झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांबद्दल बोलताना मोदींना अश्रू अनावर झाले.
“या व्हायरसने आपल्या अनेक जीवलग व्यक्तींना हिरावून घेतलं आहे. मी त्यांच्याबद्दल नम्र आदर व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करतो,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. हे बोलत असताना नरेंद्र मोदींना भावना अनावर झाल्याचं दिसत होतं.
‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकाच वेळी आपण अनेक आघाड्यांवर लढत आहोत. संसर्गदर जास्त आहे. तसेच रुग्ण बऱ्याच दिवसांपासून रुग्णालयात आहेत. आता आपल्याला वाराणसी तसेच पूर्वांचलच्या ग्रामीण परिसरात लक्ष द्यावे लागेल.
‘जहा बीमार, वहीं उपचार’ आता आपला मंत्र असणार आहे.’ असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. सध्या कोरोनाच्या उपचारासोबतच म्युकरमायकोसीसचे आव्हान भारतासमोर उभे ठाकले आहे. त्यासाठी व्यवस्था तयार करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
असेही मोदी यावेळी म्हणाले. “लसीकरणामुळे पहिल्या फळीतील योद्ध्यांना संरक्षण मिळालं असून ते लोकांची सेवा करु शकत आहेत. आगामी काळात आपण सर्वांसाठी लसीकरणाची व्याप्ती वाढवणार आहोत,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.