१० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- जिल्ह्यात १० एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

पक्षकार व नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन सामंजस्याने प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. श्रीकांत आणेकर यांनी केले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सुचनेनुसार आयोजित या राष्ट्रीय लोकदालतीत दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

जिल्हा मुख्य न्यायालयासह जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयांमध्ये घेण्यात येत असलेल्या या लोक अदालतीमध्ये न्यायालयातील दिवाणी, फौजदारी, एन आय अॅक्टची प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे,

मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायद्याखालील प्रकरणे, कौटुंबिक वादांची प्रकरणे, इलेक्ट्रीसीटी अॅक्टची समजोता योग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24