मोहटादेवी गडावर नवरात्रौत्सवाला प्रारंभ; भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- सरकारने घालून दिलेल्या गाईडलाईन नुसार आज महाराष्ट्रातील मंदिरे खुली करण्यात आली आहे. यातच नगर जिल्ह्यातील अनेक धार्मिक स्थळे देखील खुली करण्यात आली असल्याने भाविकांमध्ये कमालीचे उत्साहाचे वातावरण आहे.

यातच आज पाथर्डी तालुक्यातील प्रसिद्ध मोहटादेवी मंदिर देखील खुले करण्यात आले आहे. या ठिकाणी अत्यंत उत्साहात आज घटस्थापना करण्यात आली आहे.

तसेच श्री क्षेत्र जगदंबा ट्रस्ट मोहटादेवी गडावर अहमदनगर जिल्हा सरन्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर यांच्या हस्ते शासकीय महापूजा व आरती करून शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात करण्यात आली.

दरम्यान अहमदनगर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून शारदीय नवरात्र उत्सव साधेपणाने साजरी करणार असल्याचे विश्वस्त मंडळाने सांगितले आहे.

प्रशासनाच्या आदेशानुसर इतर कार्यक्रमांना बंदी असून फक्त दर्शन घेऊन भाविकांनी मंदिर व गड परीसर सोडायचा आहे. तशा दृष्टीने देवस्थान समितीने संपूर्ण तयारी केली आहे.

राज्य परिवहन महामंडळाची ऐनवेळी गर्दी होऊ नये म्हणून जिल्ह्याच्या विविध भागांमधून दिवसा तर पाथर्डीच्या जुन्या बस स्थानकावरून अहोरात्र बससेवा भाविकांच्या उपलब्धतेनुसार सुरू राहणार आहे.