ताज्या बातम्या

NCL Recruitment 2022 : 10वी पास तरुणांना मोठी संधी ! याठिकाणी 400 हून अधिक नोकऱ्यांसाठी लगेच करा अर्ज

Published by
Ahmednagarlive24 Office

NCL Recruitment 2022 : जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आली आहे. कारण नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL) मध्ये काही महत्वाच्या पदांसाठी भरती चालू आहे.

खनिकर्म सरदार व सर्वेक्षक पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण 405 पदे भरतीद्वारे भरण्यात येत आहेत. त्यामध्ये खाण सरदाराच्या 374 आणि सर्वेक्षकाच्या 31 पदांचा समावेश आहे.

कोण अर्ज करू शकतो?

मायनिंग सरदार प्रमाणपत्रासह 10वी उत्तीर्ण आणि सर्वेयर प्रमाणपत्रासह 10वी उत्तीर्ण किंवा खाण खात्यातील पदवी किंवा डिप्लोमा असलेले उमेदवार सर्वेयर पदांसाठी अर्ज करू शकतात.

कुठे आणि कसा अर्ज करावा?

इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइट nclcil.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. अर्जाची प्रक्रिया 1 डिसेंबरपासून सुरू होणार असून शेवटची तारीख 22 डिसेंबर आहे.

निवड प्रक्रिया आणि अधिसूचना?

संगणक आधारित परीक्षेद्वारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. परीक्षा 90 मिनिटांची असेल. ज्यामध्ये एकूण 90 गुणांचे प्रश्न विचारले जातील. याशिवाय, भरतीची अधिसूचना पाहण्यासाठी, उमेदवार या लिंकचे अनुसरण करू शकतात
तुम्ही nclcil.in/Content/nclcil.in/Document/359Detailed%20Employment%20Notification%20(English).pdf ला भेट देऊ शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office