सोनई पोलिसांचा हलगर्जीपणा… तक्रार दाखल करून घेण्यास करतायत टाळाटाळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- सोनई येथून जवळ असलेल्या शिरेगाव मधील एका लोक वस्तीवर सात ते आठ अज्ञात चोरट्यांनी तलवार व इतर हत्यारासह घरात घुसून चोरीचा मोठा थरार केला होता.

एवढी गंभीर घटना असतानाही सोनई पोलीस ठाण्यात नेहमीप्रमाणे गुन्ह्याची नोंद घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. यामुळे पोलिसांविषयी नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आहे.

अधिक माहिती अशी, शिरेगाव-सोनई जुन्या रस्त्यावर असलेल्या तुवरवस्ती येथे सूर्यकांत व विजय ज्ञानदेव तुवर या दोन भावांची घरे आहेत. सूर्यकांत तुवर हे घराला कुलूप लावून मुळा कारखाना येथील घरी होते तर मूकबधिर असलेले विजय तुवर एकटेच घरी होते.

मध्यरात्री एक ते दोन वाजता पाच चोरटे दरवाजा तोडून घरात घुसले. तलवार उगारुन मूकबधिर विजय यास मारहाण केली. रात्री अडीच वाजता सूर्यकांत तुवर यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली होती.

तुवर बंधू फिर्याद देण्यासाठी गेले असता घटनास्थळी येवून माहिती घेवू असे सांगत टाळाटाळ झाल्याचे समजते. हद्दीत शेळ्या व मोटारसायकल चोरीच्या अनेक घटना होवूनही नोंद घेत नसल्याचे चित्र आहे.

पोलिसच जनतेचे रक्षण करणार नसल्याने नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. तरी वरीष्ठांनी याबाबत लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.