अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा अक्षरश कहर झाला आहे. यातच आता राहाता तालुक्यापाठोपाठ श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होताना दिसून येत आहे.
यातच तालुक्याने गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांची शंभरी ओलांडली आहे. तालुक्यात बुधवारी उच्चांकी ११६ रुग्ण सापडले आहेत तर काल दिवसभरात ६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
दरम्यान तालुक्यात सध्याच्या परिस्थितीत ४३१ रुग्ण अॅक्टिव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. श्रीरामपूर तालुक्यात काल ११६ करोना बाधित रुग्ण सापडले आहेत.
जिल्हा रुग्णालयात ४९, खासगी रुग्णालयात ४४ तर अॅन्टीजेन तपासणीत २३ असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल ६९ जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे.
तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे १०१९ रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे ४८६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
तर सध्या एकूण अंदाजे ४३१ रुग्ण विविध कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ पाहता जिल्ह्यात पहिल्या पाच तालुक्यांत श्रीरामपूरचा तिसरा नंबर लागला आहे. हि तालुक्यासाठी अत्यंत चिंताजनकबाब आहे.