आमदार लंकेच्या पारनेर तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींचे नव्याने आरक्षण सोडत जाहीर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर अनेक ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडी जाहीर झाल्या होत्या.

मात्र आमदार लंकेच्या पारनेर तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींचे नव्याने आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे. तहसील कार्यालयाच्या दालनात भाऊसाहेब खेडेकर,

प्रांताधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांनी ही आरक्षण सोडत काढली आहे. सविस्तर माहिती अशी कि, पारनेर तालुक्यातील गेल्या महिन्यात सरपंचपदाचे आरक्षण सोडतीमध्ये भोयरे गांगर्डा,

वडझिरे, वडगाव दर्या, वाघुंडे बुद्रुक आणि पाबळ या 5 ग्रामपंचायतींचे नव्याने आरक्षण सोडत प्रांताधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांनी शुक्रवारी (दि. 26) जाहीर केली आहे.

यामध्ये भोयरे गांगर्डा, वडगाव दर्या सर्वसाधारण महिलेसाठी सरपंचपद आरक्षित करण्यात आलेले आहे. तर पाबळ आणि वाघुंडे बुद्रुकसाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ठेवण्यात आले आहे. वडझिरे हे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी नवीन आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे.

या पाचही गावांमध्ये निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये सरपंचपद नसल्याने ग्रामपंचायतसह प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे यासंबंधी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी मार्गदर्शन मागितले होते.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24