अल्फा, डेल्टा, डेल्टा प्लसनंतर कोरोनाचा नवा अवतार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14  जुलै 2021 :-  देशात कोरोनाच्या विषाणूंचे नवे प्रकार समोर येत आहेत. हा विषाणू म्युटेट होत असून त्याच्या वेगवेगळ्या प्रकारांचा प्रसार होऊ लागला आहे.

आत्तापर्यंत कोरोनाच्या अल्फा, डेल्टा, डेल्टा प्लस अशा प्रकारांची चर्चा असताना आता कोरोनाच्या कप्पा विषाणू चे रुग्ण सापडू लागले आहेत. राजस्थानमध्ये कोरोनाच्या कप्पा व्हेरिएंटचे ११ रुग्ण आढळले आहेत.

राज्याचे वैद्यकीय व आरोग्य मंत्री डॉ. रघु शर्मा यांनी मंगळवारी ही माहिती दिली. याआधी उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या कप्पा व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडले होते.

कोरोना विषाणूच्या कप्पा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या ११ रुग्णांपैकी चार जण अलवर आणि जयपूरचे, दोन बाडमेर आणि एक भिलवारा येथील आहेत.

जनुकीय सर्वेक्षणनंतर या प्रकरणांची माहिती मिळाली, असे डॉ. रघु शर्मा म्हणाले. डेल्टा प्रकारापेक्षा कप्पा व्हेरिएंट कमी प्राणघातक आहे असे वैद्यकीय मंत्री म्हणाले. मंगळवारी राजस्थानमध्ये २८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात ६१३ उपचाराधीन रूग्ण आहेत. यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमध्ये कप्पाच्या व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडले होते.

राजस्थानमध्ये बोलताना आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मंगळवारी चोवीस तासांत कोरोनाचे २८ नवीन रुग्ण आढळले आहेत.

मात्र कोरोनामुळे राज्यात कोणत्याही नवीन मृत्यूची नोंद झालेली नाही. यासह, कोरोना व्हायरस संसर्ग झालेल्यांची संख्या ९ लाख ५३ हजार १८७ वर पोहोचली आहे.

तर आतापर्यंत ८,९४५ जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. राज्यात सध्या ६१३ सक्रिय रुग्ण आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24