Petrol Diesel Price : सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती घसरल्याचे पाहायला मिळत आहे. मागील दोन आठवड्यांपासून कच्चा तेलाचे दर आटोक्यात आले असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
हे लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ठरवल्या जातात. दररोज सकाळी सरकारी तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात. परंतु, आजही या कंपन्यांनी इंधनाच्या किमतीत कोणताही बदल केला नाही.
हा आहे आजचा पेट्रोल डिझेलची किंमत
सध्या दिल्ली येथे पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर आहे. मुंबई येथे पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर, चेन्नई येथे पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
येथे मिळत आहे सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल
राजस्थान येथील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल विकले जात आहे. गंगानगर जिल्ह्यात पेट्रोल 113.48 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 98.24 रुपये प्रति लिटर आहे. तर हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल 112.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.39 रुपये प्रतिलिटर आहे.
येथे मिळत आहे सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल
पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळत आहे. येथे पेट्रोलचा दर 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 79.74 रुपये प्रति लिटर आहे.
जाणून घ्या आजचे नवीनतम दर
दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.
मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर.
कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.
चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.
हैदराबाद : पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.
बंगळुरू : पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.
तिरुअनंतपुरम: पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर: पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.
भुवनेश्वर: पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर.
चंदीगड : पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर.
लखनौ : पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लिटर.
नोएडा: पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर.
जयपूर : पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.
पाटणा : पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
गुरुग्राम: 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर.
अशी आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत वाढ होताना पाहायला मिळत आहे. या घसरणीनंतर डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $77 आणि ब्रेंट क्रूड $83 प्रति बॅरल जवळ पोहोचले आहे. जुलै 2008 नंतर गेल्या वर्षी मार्चमध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहोचल्या होत्या. देशात त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही घट झालेली नाही.
उत्पादन शुल्कात कपात
सरकारने या अगोदर 21 मे रोजी पेट्रोल डिझेलच्या आजच्या किमतीवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात केली आहे. त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात घट झाली होती. यानंतर देशात डिझेल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्राच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारकडूनही व्हॅटमध्ये कपात करण्यात आली.