अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- पारनेर तालुक्यातील गेल्या महिन्यात सरपंच पदाचे आरक्षण सोडतीमध्ये भोयरे गांगर्डा वडझिरे वडगाव दर्या वाघुंडे बुद्रुक पाबळ ५ ग्रामपंचायतीचे नव्याने आरक्षण सोडत प्रांत अधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांनी शुक्रवारी जाहीर केले आहे.
तहसील कार्यालयाच्या दालनात जय भाऊसाहेब खेडेकर प्रांत अधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांनी ही आरक्षण सोडत काढली आहे. यात भोयरे गांगर्डा वडगाव दर्या सर्वसाधारण महिलेसाठी सरपंच पद आरक्षित करण्यात आलेली आहे.
तर दुसरीकडे पाबळ आणि वाघुंडे बुद्रुकसाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ठेवण्यात आले आहे. तर वडझिरे हे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी नविन आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे.
या पाचही गावांमध्ये निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये सरपंच पद नसल्याने ग्रामपंचायतासह प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला होता त्यामुळे निवडणूक आयोगाकडे यासंबंधी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी मार्गदर्शन मागितले होते.
त्यानुसार काल या पाचही गावांमध्ये नव्याने सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.