नूतन सरपंच व उपसरपंच यांचा प्रलंबीत विकासकामे मार्गी लावण्याचा सपाटा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- नगर तालुक्यातील खोसपुरी येथे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांनी पदभार स्विकारुन गावाच्या प्रलंबीत विकास कामांचा शुभारंभ केला.

नुकतेच सरपंच नशिबाबी मुबारक पठाण यांनी पदभार घेतल्यानंतर गावातील प्रलंबीत विकासकामे मार्गी लावण्याचे काम सुरु केले असून, विकासात्मक दृष्टीने संपूर्ण गावाची वाटचाल खर्‍या अर्थाने सुरु झाली आहे.

गावातील जिल्हा परिषद शाळेला पेव्हिंग ब्लॉक बसवून, वॉल कंम्पाऊंड करणे, अंगणवाडी समोरील परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे व सुशोभीकरणाच्या कामाचे भुमीपूजन करण्यात आले.

त्याचबरोबर नागरगोजे वस्तीसाठी पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाइन मंजूर करून त्या कामाला देखील सुरुवात करण्यात आली.

यावेळी सरपंच नशिबाबी मुबारक पठाण, उपसरपंच प्रशांत भालेराव, ग्रामपंचायत सदस्य अविनाश आव्हाड, करीम बेग, कय्यूम शेख, माजी सरपंच सत्तार शेख, अर्जुन आव्हाड, बाबाभाई शेख, प्रवीण आव्हाड, गणेश भिसे,

हरिभाऊ हारेर, भारत देवकर, शांताराम शिरसाठ, त्रिंबक नागरगोजे, पोलीस पाटील अंबादास देवकर, भाऊसाहेब भिसे, भाऊसाहेब देवकर,

अस्लम बेग, जाकीर शेख, संभाजी भिसे, शरद भालेराव, रामभाऊ देवकर, भिसे काका, बाबू हमीद शेख, गणेश साळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • किंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24