अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- नेवासे तालुक्यातील बेलपिंपळगाव गटातील ४४ लाख रुपये किंमतीच्या विविध गावांमधील रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण उदयन गडाख यांच्या हस्ते मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
उदयन गडाख म्हणाले, बेलपिंपळगाव जिल्हा परिषद गटामध्ये रस्ता कामाचा अनुशेष होता. तो अनुशेष मंत्री शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांच्या नेतृत्वाखाली भरून काढला जाणार आहे.
गटातील मोठी विकासकामे मार्गी लागतील. नेवासे तालुका मंत्री शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांना राज्यात अग्रेसर तालुका बनवायचा आहे, यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे सांगितले.
बेलपिंपळगाव गटातील जिल्हा परिषद गटातील विविध रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते.
घोगरगाव येथील घुमनदेव रस्ता मजबुतीकरण करणे, बेलपांढरी येथील कनगरेवस्ती मुरूमीकरण, भालगाव येथील भालगाव ते गोधेगाव रस्ता ते गुप्ताई माता मंदिर रस्ता खडीकरण,
भालगाव येथील वाडी अंतर्गत रस्ते, तनपुरेवाडी ते गुप्ताई रोड, बकुपिंपळगाव शिवारातील देवगड फाटा ते पांढरे वस्ती मुरमीकरण अशा विविध रस्ता कामांचे लोकार्पण झाले.
यावेळी मुळा कारखाना संचालक बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके, पंचायत समितीचे सदस्य रवींद्र शेरकर, सरपंच कैलास झगरे, इक्बाल शेख, प्रवरासंगम सरपंच संदीप सुडके, संजय लोखंडे आदी उपस्थित होते.