अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :-    नेवासे शहर व परिसरात दर रविवारी जनता कर्फ्यू व दररोज सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व दुकाने व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी दिली.

मुख्याधिकारी गर्कळ म्हणाले, कोविडमुळे संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी तसेच त्याचा फैलाव रोखण्यासाठी नेवासे शहर व परिसरात दररविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय नेवासे शहरातील व्यापारी असोसिअशन,

नेवासे नगर पंचायत प्रशासन तसेच तहसील व पोलिस व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सर्व व्यापारी बंधू, भाजीपाला फळ, दूध, अंडी, मटण विक्रेते व इतर सर्व लघू व्यावसायिक यांनी वरील झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. दर रविवारी होणाऱ्या जनता कर्फ्युचे पालन करावे.

सोमवार ते शनिवार दररोज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवावीत, असे आवाहन नगराध्यक्ष योगीता सतीश पिंपळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव जगताप यांनी केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24