पुढचे टार्गेट जितेंद्र आव्हाड….. ठाकरे सरकारला ओपन चॅलेंज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री आणि नेते यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करत भष्ट्राचाराची प्रकरणे बाहेर काढण्याची मोहिमच हाती घेतली आहे.

अनिल परब यांच्या वसुली प्रकरणात अडकलेले परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या फार्म हाऊसची पाहणी करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी थेट सांगली गाठली.

आपले Next टार्गेट जितेंद्र आव्हाड असल्याचे म्हणत त्यांनी आव्हाड यांना थेट बॅग भरण्याच्या सूचना केल्या आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांचा आता काऊंटडाऊन सुरू झाला आहे, आणि त्यांचे विशेष सचिव बजरंग खरमाटे यांच्याकडे बेहिशोबी साडेसातशे कोटींची मालमत्ता आहे, ती कुठून आली याची मागणी आपण केली आहे.

तर खरमाटे यांची ही संपत्ती आहे की,अनिल परब यांची बेनामी पैसा आहे, लवकरच समोर येईल,पण ठाकरे सरकारांचा एक अनिल तुरुंगाचा दरवाजावर आहेत, तर दुसरा अनिल म्हणजे अनिल परब मुहूर्त काढत आहे, अश्या शब्दात भाजपाचे माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे.

खरमाटे यांची ईडिची चौकशी सुरू झाली आहे आणि त्यानंतर सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्याकडून ही चौकशी होईल, असे मतही किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले. सांगलीच्या तासगाव येथील वंजारवाडी मधील बजरंग खरमाटे यांच्या आलिशान घराची किरीट सोमय्या यांनी पाहणी केली, त्यानंतर ते बोलत होते.

याचा पगार 70 ते 80 हजार मग 270 कोटींची फॅक्ट्री कशी? दिवाळी पर्यंत सर्व घोटाळे उघड करणार आहे.भावना गवळीसह अनेक जण लवकरच सापडतील असा दावाही सोमय्या यांनी केला.