अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- सामाजिक कार्यात हातभार लावतांना समाज सेवा करतांना पद असणे गरजेचे नसते पण मिळालेल्या पदाचा उपयोग चांगला करता आला तर समाज कल्याणासाठी करावा, नगरसेवक म्हणून काम करतांना नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची जशी माझी जबाबदारी आहे.
तशी प्रभागातील मंदिरांच्या परिसराचे सुशोभिकरणाचे काम करणे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केले. शिलाविहार येथील बहार अर्बन बँक कॉलनी येथे गणेश मंदिराचा 35 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मंदिर परिसरात वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेज, लहान मुलांना खेळणी, वृद्धांसाठी बाकडे बसविण्यात आली. कॉलनीतील रस्ते डांबरीकरण करण्यात आले. सर्वत्र सुशोभिकरण केल्यामुळे नगरसेविका रुपालीताई वारे, निखिल वारे यांचा रहिवासीयांच्यावतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी हेमंत बल्लाळ, सुधाकर देशपांडे अरविंद हिकरे, मच्छिंद्र तुवर, एकनाथ चेमटे, बिभिषण अनभुले, प्रकाश दहिफळे, सतीश शहा, सतीश वल्लाळ, प्रसाद रिंगणे आदिंसह भाविक उपस्थित होते. श्री.वारे पुढे म्हणाले, विकास कामे करतांना भेदभाव केला नाही. समतोल विकास साधण्याचा प्रयत्न केला.
प्रभाग मोठा असल्याने आम्ही चारही नगरसेवक प्रत्येक उपनगर, कॉलनीचा विचार करतो. त्यामुळे नागरिक देखील समाधानी आहेत, असे सांगितले. प्रास्तविकात हेमंत बल्लाळ यांनी सांगितले की, 15 ऑगस्ट 1987 रोजी गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना करुन मंदिर उभारले.
कॉलनीतील लोकांना एकत्रित येण्यासाठी मंदिराच्या माध्यमातून भक्तीमय वातावरण तयार होते. येथील गणेश मंदिरात असंख्य भाविक दर्शनासाठी रोज येतात. चतुर्थीला गर्दी होते, भक्तगण गणपतीला साकडे घालतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने या मंदिराचे महत्व वाढत आहे.
सध्या कोरोनामुळे साध्या पद्धतीने मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम केला असल्याचे सांगितले. या वर्धापन दिनानिमित्त महाप्रसादाला भाविकांनी उपस्थिती लावली. माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, नगरसेवक विनित पाउलबुधे, यांनी प्रसादाचा लाभ घेतला.