Nissan Kicks : जर तुम्ही नवीन स्टायलिश कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा. कारण भारतीय ऑटो बाजारात आता Nissan ची नवीन कार सादर होणार आहे. शक्तिशाली इंजिनसह कंपनी लवकरच Nissan Kicks कार लाँच करू शकते.
अनेक दिवसांपासून कंपनी या कारवर काम करत आहे. त्यामुळे कंपनी आपल्या इतर कारप्रमाणे या कारमध्येही शानदार फीचर्स देईल. परंतु हे लक्षात घ्या की अजूनही कंपनीने ही कार बाजारात कधी दाखल होणार याची कोणतीही माहिती दिली नाही.
पहा पॉवरट्रेन
नवीन निसान किक्स या कारमध्ये मजबूत पॉवरट्रेन देईल. यामध्ये कंपनी 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देऊ शकते. तसेच हे इंजिन इलेक्ट्रिक मोटरसोबत जोडण्यात येईल.
सर्वोत्तम कार
सध्या रेनॉल्ट आणि निसान इंडिया एका उत्तम कारवर एकत्र काम करत आहेत. या दोन्ही कंपन्या CMF-B प्लॅटफॉर्मवर सुमारे 4 वाहने लॉन्च करू शकतात. ही वाहने कंपनी 2025 च्या आसपास बाजारात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जाणून घ्या निसान Kicks ची किंमत
कंपनीकडून अजूनही या कारची किंमत जाहीर करण्यात आली नाही. परंतु असे मानले जात आहे की कंपनी ही कार बाजारात 12 ते 16 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च केली जाऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही आलिशान कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर कंपनीची ही आगामी निसान इंडिया कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल. इतकेच नाही तर या कारचा लूक हा अतिशय स्टायलिश असणार आहे. कंपनी या कारमध्ये जबरदस्त सेफ्टी फीचर्स देण्याची दाट शक्यता आहे.