Nissan Magnite : Kia आणि Brezza चं टेन्शन वाढलं! Nissan च्या ‘या’ दमदार SUV वर मिळतेय 87000 रुपयांची सूट

Pragati
Published:
Nissan Magnite

Nissan Magnite : Kia आणि Brezza ची डोकेदुखी वाढली आहे. कारण आता Nissan च्या दमदार कारवर शानदार डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे तुमची खरेदीवर हजारो रुपयांची बचत होऊ शकते. यात कंपनीने शानदार फीचर्स दिली आहेत.

कंपनीकडून आपल्या नवीन कारमध्ये 7-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. शिवाय बूट स्पेस 336 लीटर असून यात ADAS, एअरबॅग्ज यांसारखी उत्तम फीचर्स पाहायला मिळतील. कंपनी आता या SUV वर 87000 रुपयांची सूट देत आहे.

पाच ट्रिम्स ऑफर

नवीन Nissan Magnite मध्ये एकूण पाच ट्रिम्स ऑफर करण्यात आल्या आहेत. या शानदार कारमध्ये 999 सीसीचे पेट्रोल इंजिन दिले असून ही शानदार SUV बाजारातील Maruti Suzuki Brezza,Kia Sonet, Hyundai Venue आणि Tata Nexon ला टक्कर देते. तसेच यात टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे.

8.0-इंच एचडी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम

कंपनीच्या नवीन कारमध्ये 8.0-इंचाची एचडी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. यात ९८.६३ पीएस पॉवर आणि १६० एनएम पीक टॉर्क मिळेल. महत्त्वाचे म्हणजे ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. यात 20 kmplचे मायलेज मिळते.

336 लीटर बूट स्पेस

Nissan च्या नवीन कारमध्ये बूट स्पेस 336 लीटर असून यात ADAS, एअरबॅग्ज यांसारख्या सुरक्षिततेसाठी उत्तम फीचर्स पाहायला मिळतील. किमतीचा विचार केला तर ही कार बाजारात 6 लाख रुपये ते 11.02 लाख रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत ऑफर केली आहे. या कारला वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले मिळत आहेत. शिवाय यात 7-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे.

कलर पर्याय

या कारच्या पुढील केबिनमध्ये दोन एअरबॅग दिल्या आहेत. ही कार तीन ड्युअल टोन आणि पाच मोनोटोन रंगांत खरेदी करता येईल. यात 360-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल हिल-स्टार्ट असिस्ट आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम सारखी फीचर्स दिली आहेत. शिवाय या कारमध्ये पुश-बटण स्टार्ट/स्टॉप आणि मागील व्हेंटसह ऑटो एअर कंडिशनिंगचा पर्याय मिळेल.

5-स्पीड गिअरबॉक्स

कंपनीच्या कारच्या प्रीमियम ट्रिम्स, एअर प्युरिफायर, XV आणि XV मध्ये वायरलेस फोन चार्जर, JBL स्पीकर, अॅम्बियंट लाइटिंग यांसारखी प्रगत फीचर्स दिली आहेत. ही कार 5-स्पीड गिअरबॉक्ससह येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe