अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील एंटेलिया या निवासस्थानाबाहेर गुरूवारी संध्याकाळी स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळल्याने एकच खळबळ उडाली. गाडीत जिलेटीन या स्फोटकांच्या सुट्टया कांड्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान आता गाडीत एक पत्रही सापडल्याची माहिती समोर आली आहे.“नीता भाभी और मुकेश भैय्या, ये तो ट्रेलर है” अशा आशयाचं पत्र पोलिसांना अंबानींच्या घराबाहेर असलेल्या स्कॉर्पिओमधून सापडल्याची माहिती आहे.
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर पार्क केलेल्या गाडीत स्फोटकांच्या बॅगसोबत एक पत्रही पोलिसांनी मिळाले. या पत्रातून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे. ‘डियर नीता भाभी और मुकेश भैय्या और फॅमिली.. ये तो सिर्फ ट्रेलर है अगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे फॅमिली को उडाने….संभल जाना…’, असा मजकूर या पत्रात आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी अंबानींच्या घराबाहेर बंदोबस्तात वाढ केली असून जलद प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे. कारमायकल रोडवर मोठया प्रमाणावर पोलिसांसह कमांडोही तैनात करण्यात आले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.
या घटनेमुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांच्या तपासात बुधवारी रात्री ही गाडी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केल्याचे समोर आले होते. आता या गाडीबाबत मोठी माहिती पुढे आली आहे.
ही गाडी चोरीची असल्याची माहिती आहे. संशयास्पदरित्या स्फोटक भरुन आलेली ही गाडी विक्रोळी इथून चोरी झाल्याची माहिती आता समोर येत आहे. सात ते आठ दिवसांपूर्वी ही गाडी चोरी झाली होती, अशी माहिती आहे. तशी तक्रारही विक्रोळी पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती आहे.