अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :- ज्यांनी आयुष्यभर विठ्ठलाची भक्ती केली, कीर्तनातून समाजप्रबोधन केले, त्यांच्या पाठिशी या निकालाच्या निमित्ताने जणू पांडुरंगच उभा राहिला, असे प्रतिपादन माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी केले.
अकोले तालुक्याचे सुपुत्र, समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्यावर त्यांच्या एका वक्त्यव्यासंदर्भात भरण्यात आलेल्या खटल्यातून त्यांची नुकतीच निर्दोष मुक्तता झाली.
याबद्दल अकोले तालुक्याच्या वतीने तालुक्यातील विविध मान्यवरांनी संगमनेर तालुक्यातील ओझर येथील निवृत्ती महाराज देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याच वेळी त्यांचे वकील अगस्ति देवस्थानचे अध्यक्ष ॲड. के. डी. धुमाळ यांचाही सत्कार करणयात आला. अकोलेकरांच्या या प्रेमाने देशमुख कुटुंबीय भारावून गेले. माजी मंत्री पिचड म्हणाले, की सत्य हे सत्यच असते,
याचे उदाहरण देताना त्यांनी कोळी महादेव, हिंदू महादेव कोळी या जातीच्या प्रमाणपत्राबत व गोवारी हत्याकांडाबाबत सर्वोच्च न्यायालयाने माझ्या बाजुने निकाल दिला, तसाच ऐतिहासिक निकाल महाराज यांच्या बाबतीत झाला आहे.
याचा मनस्वी आनंद मलाच नव्हे, तर संपूर्ण राज्याला झाला आहे, अशी भावना व्यक्त केली. कदाचित हा निकाल ऐकण्यासाठीच मी आजारातून बरा झालो आहे, हे माझे भाग्य आहे. आपल्या बुद्धी कौशल्यावर ऐतिहासिक न्यायालयीन निकाल घेण्याचे काम वकील धुमाळ यांनी केले,
याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी म्हटले. माजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले की, भविष्यात ज्या ज्या वेळी आध्यत्मिक अस्मितेवर कोणी घाला घालील, त्या-त्यावेळी निवृत्ती महाराज देशमुख यांच्या बाबतीत झालेला न्यायालयीन निकाल हा पुढे संदर्भ म्हणून वापरला जाईल.
महाराजांनी खऱ्या अर्थाने समाजातील चुकीच्या चालीरीती, रूढी, परंपरा यावर डोळस नजरेतून प्रबोधन केले. ते नेहमी धार्मिक ग्रंथांचा संदर्भ देऊनच प्रबोधन करीत असतात, असे ते म्हणाले. यावेळी वकील वसंतराव मनकर यांचेही भाषण झाले.
यावेळी अकोले तालुक्याच्या वतीने ॲड. के. डी. धुमाळ, किरण महाराज शेटे, ज्ञानेश्वर माऊली आरोटे, दिपक महाराज देशमुख, दत्ता अस्वले यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अकोले वकील संघाचे अध्यक्ष ॲड. भाऊसाहेब गोडसे, भाजपचे तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सचिन शेटे, परशूराम शेळके, रोटरी क्लबचे संस्थापक अमोल वैद्य, माजी अध्यक्ष सचिन देशमुख, प्रविण झोळेकर,
तुषार सुरपुरीया, राज गवांदे, विजय पवार, हितेश कुंभार, ज्ञानदेव निसाळ, संदीप दातखिळे, श्रीकांत वाकचौरे, रोहिदास जाधव, नितीन गायकवाड, गोकुळ वाघ, अमोल आरोटे,
नाजीम शेख, सचिन गवारी, सुगावचे माजी सरपंच सुनील देशमुख, सचिन उगले, अविनाश देशमुख, किरण देशमुख, गणेश देशमुख, अमित वाकचौरे यांच्यासह कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.