SBI ATM Rules: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांसाठी (customers) महत्त्वाची बातमी. बँकेने (Bank) एटीएम व्यवहारांचे ( ATM Rules) नियम बदलले आहेत. एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या, नाहीतर होणार मोठं नुकसान.
1 लाख रुपयांच्या शिल्लक रकमेवर व्यवहार शुल्क आकारले जाणार नाही
एसबीआयच्या नवीन नियमांनुसार, बँक खात्यात एक लाख रुपये ठेवल्यास एटीएम व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या स्थितीत तुम्ही इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून व्यवहार केल्यास तुम्हाला तीन वेळा पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. मात्र, SBI नसलेल्या एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वेगळी आहे.
निश्चित मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी शुल्क आकारले जाते
बँक बॅलन्स तपासल्यावर द्यावा लागणार शुल्क
एटीएम शुल्काव्यतिरिक्त, बँका ग्राहकांकडून वेगवेगळ्या प्रकारे शुल्क देखील आकारतात. उदाहरणार्थ, तुमच्या एटीएममधून बँक शिल्लक तपासण्यासाठी रुपये 5 आणि इतर बँकेच्या एटीएममधून शिल्लक तपासण्यासाठी रुपये 8 शुल्क आकारले जाते. तथापि, बँक खात्यात 1 लाख रुपयांपेक्षा जास्त शिल्लक ठेवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
एसबीआयने यापूर्वी व्याजदर वाढवले होते
इंटरनेट बॅलन्स ट्रान्झॅक्शनवर एकूण रकमेच्या 3.5 टक्के आणि 100 रुपये अतिरिक्त भरावे लागतील. त्याच वेळी, SBI ने अलीकडेच FD (फिक्स्ड डिपॉझिट) वर व्याजदर वाढवले होते. 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवरील एफडीवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.