करोना लसीची एकही गाडी पुण्याबाहेर जाऊ देणार नाही; या नेत्याने दिला इशारा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-कोरोनाचे संकट महाराष्ट्रात दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. पण संकटाचे भान न ठेवता यानिमित्त जी राजकीय हुल्लडबाजी सुरू आहे ती महाराष्ट्राच्या परंपरेस शोभणारी नाही.

महाराष्ट्रात निर्माण झालेल्या कोरोना लसींच्या तुटवड्यावरुन केंद्र सरकार विरुद्ध राज्य असा संघर्ष तापायला सुरुवात झाली आहे.

या वादात आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उडी घेतली आहे. येत्या आठवडाभरात महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा वाढवून मिळाला नाही तर

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून दुसऱ्या राज्यांमध्ये कोरोना लसी घेऊन जाणारी एकही गाडी बाहेर पडून देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

राजु शेट्टी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांना एक पत्र लिहिलं आहे.

आठवड्याच्या आत महाराष्ट्राला आवश्यक असलेल्या लस पुरवठ्यात वाढ केली नाही तर इतर राज्यांमध्ये लस घेऊन जाणारी वाहने सीरममधून बाहेर जाऊ देणार नाही.

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना लसीचा तुटवडा असून मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्र्यांनीही यासंदर्भात केंद्राकडे विचारणा केली आहे.

मात्र, यावरुन चांगलच राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. भाजपा नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री यांच्यात शाब्दीक युद्ध सुरू आहे.

मात्र, महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती पाहता, राज्याला लसींचा मोठ्या प्रमाणात पुरवठा व्हावा, अशी राज्यातील जनेतची इच्छा आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24