ताज्या बातम्या

राज्यात कोणत्याही निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात येऊ नयेत

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षणाबाबतची याचिका फेटाळून लावल्याने ओबीसी समाजाला कोणतीही निवडणूक लढवता येणार नसल्याने ओबीसी समाजावर अन्याय होत आहे.(Ahmednagar news)

ओबीसी आरक्षण लागू केल्याशिवाय कोणतीही निवडणूक घेण्यात येऊ नये अशी मागणी ओबीसी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना ओबीसी काँग्रेस विभागाच्या वतीने देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने ओबीसींचे २७ टक्के राजकीय आरक्षण जशास तसे ठेवले. परंतू ते सुध्दा कोर्टाने फेटाळून लावले. त्यामुळे ओबीसी समाजाचा साधा ग्रामपंचायत सदस्य सुध्दा होऊ शकत नाही.

उद्या शैक्षणिक आरक्षण घालवण्याचे महापाप भाजप करेल. त्यामुळे आरक्षण टिकविण्यासाठी रस्त्यावर उतरून केंद्र सरकार विरोधात लढाई लढण्याची कॉंग्रेसची भूमिका असल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे ओबीसींना त्यांचे राजकीय आरक्षण मिळेपर्यंत राज्यात कोणत्याही निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात येऊ नयेत, अशी मागणी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office