अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :- जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे पणे जिल्ह्याच्या सीमेवर कडक तपासणी करूनच वाहणे सोडली जात आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात जिल्हा बंदीचा आदेश लागू झाल्याासून गव्हाणवाडी येथे बेलवंडी पोलिसांचे तपासणी पथक आहे. वाहंनाची गर्दी होत आहे सध्या लोक परवानगी घेऊन आपल्या वाहनातून इच्छित ठिकाणी जात आहेत.
जे नागरिक पुणे, मुंबईसह इतर जिल्ह्यातून विनापरवाना प्रवास करू इच्छितात. अशा वाहनांना मात्र जिल्ह्यात नो एन्ट्री आहे. त्या वाहनांना परत माघारी पाठवले जात आहे नाही तर वाहनधारकांकडून दंड आकारला जात आहे.
दिवसेंदिवस राज्यातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ही ताण आला आहे तसेच राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर, बेडचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे वाहन तपासणी अधिक कडक केली जात आहे. बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोरुडे,
हेड कॉन्स्टेबल एम.एल. सुरवसे, पी.बी ठोकळ, संपत गुंड, महिला पोलिस नाईक एस.एस.काळे, होमगार्ड सचिन काळाणे, सचिन कोरडकर, अक्षय गायकवाड, संतोष लगड आदी उपस्थित होते.