file photo

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- प्रकृती ठीक नसल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येऊ शकले नाहीत. मात्र राजकारणी त्याचेच भांडवल करीत पालकमंत्र्यांना जिल्ह्यात येऊ देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.

यामुळे आता प्रतिक्रियेला उत्तर आले पठारी तालुक्यातील करंजी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शेख म्हणाले कि, पालकमंत्र्यांना जिल्ह्यात येण्यास कोणीही रोखू शकत नाही.

त्यांनी रोखून दाखवावेच असे आव्हान देखील त्यांनी विरोधकांना केले आहे. पुढे बोलताना शेख म्हणाले कि, पाथर्डी शेवगाव तालुक्यात झालेल्या

ढगफुटीमुळे या नुकसानग्रस्त भागाची राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तात्काळ पाहणी करून प्रशासनाला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत.

पालकमंत्री आजारी पडल्यामुळे ते जिल्ह्यात येऊ शकले नाहीत. त्याचेच विरोधकांकडून भांडवल केले जात असून ही खेदाची बाब आहे.

पालकमंत्र्यांना जिल्ह्यात येण्यास कोणी रोखू शकत नाही आणि तसा कोणी प्रयत्न केल्यास तो राष्ट्रवादी विकास आघाडीचे कार्यकर्ते हाणून पाडतील असे राजू शेख यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या सोबत…

विरोधकांकडून परिस्थितीचे भांडवल सुरु असले तरी राज्य सरकार शेतकर्‍यांसोबत आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेले शेतकर्‍यांचे नुकसान झाले असून

शेतकर्‍याला सरकारच्या माध्यमातून निश्चित मदत केली जाणार असून पंचनामे पूर्ण होताच प्रशासनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मदत केली जाणार आहे.