अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-राज्यात कोरोना रुग्णामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे ,अनेक उपाययोजना ,बंधने येत आहेत .राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाला .
अहमदनगर जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांमध्ये वाढ झालीये , अहमदनगर जिल्हा प्रशासनास याचा विसर पडल्याचे जाणवतेय कारण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला
नेवासा तालुक्यातील घोडेगाव जनावरांचा बाजारात कोरोनाची कसलीही भीती नसल्याचे चित्र आहे ,बाजारात शुक्रवारी हजारो लोक येतात ,राज्यभरातून खरेदी विक्री साठी या ठिकाणी मोठी गर्दी होते .
या मध्ये ९० % लोकांच्या तोंडास मास्क बांधत नसल्याचे दिसत आहे .कुणीही मास्क बांधत नसून येथे व्यवहार देखील उपरण्या खाली हातात हात घालून होतात .अनेक महिन्या नंतर हा बाजार सुरू झाला ,
परिसरातील अनेकांचा रोजी रोटीचा प्रश्न सुटला परंतु कोरोना उपाययोजनेंचा सर्वांना विसर पडलेला दिसून येत आहे .पुन्हा बाजार बंद व लॉकडाऊन करायचा नसेल तर काळजी घेणे गरजेचे आहे.