कोरोना लाट मोठी असल्याने कोणीही निष्काळजीपणा करू नये आता ‘होम आयसोलेशन’ बंद !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोना लाट मोठी असल्याने कोणीही निष्काळजीपणा करू नये. ग्राम दक्षता समिती अधिक सक्रिय करत घरोघर जाऊन तपासणी करा.

लक्षणे आढळल्यास सक्तीचे संस्थात्मक विलगीकरण करा, होम आयसोलेशन बंद करा, अशा सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकारी व प्रशासनाला केल्या. अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झालेल्या आढावा बैठकीत मंत्री थोरात बोलत होते.

आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, सभापती सुनंदा जोर्वेकर, मीरा शेटे, डॉ. हर्षल तांबे, उपसभापती नवनाथ अरगडे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, वि. र. मुर्तडक, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, सीताराम राऊत, मिलिंद कानवडे,

प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, पांडुरंग पवार, डॉ. संदीप कचोरीया,

कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, अनिल शिंदे, महेश वाव्हळ उपस्थित होते. मंत्री थोरात म्हणाले, ग्रामपंचायत, पं. स. व जि. प. सदस्य, नगरसेवकांनी आपल्या भागात अधिक लक्ष द्यावे.

ताप किंवा अन्य काही लक्षणे आढळल्यास होम क्वारंटाइन बंद करून संस्थात्मक विलीगीकरण करा. कर्मचाऱ्यांनी घरोघर जाऊन तपासणी केली, तर रुग्ण शोधता येतील.

भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व द्या. आमदार डॉ. तांबे म्हणाले, कोरोना थांबवण्यासाठी स्वयंस्फूतर्ता महत्त्वाची आहे. सर्वांनी एकजुटीने लढायचे आहे. कोणत्याही परिस्थितीत तालुका कोरोनामुक्तीकडे न्यायचा आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24