अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- संपूर्ण शहरभर मंगल कार्यालयांत लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. यामुळे नागरिकांचे होणारे हाल आता थांबणार आहे, मंगल कार्यालय मध्ये नागरिकांना खुर्च्यांची व्यवस्था केली आहे, त्यामुळे गर्दीही नियंत्रणात आली. लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाही.
संजोग हॉटेलच्या माध्यमातून लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना चहा-बिस्कीट व नाष्ट्याची व्यवस्था देखील केली आहे. लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी केले.
संपत बारस्कर यांच्या विशेष प्रयत्नातून संजोग हॉटेल येथे लसीकरण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेविका दीपाली बारस्कर, नगरसेविका मीना चव्हाण, प्रदीप पंजाबी,अजय पंजाबी,डॉ. गाढे, मोहित पंजाबी आदी उपस्थित होते.
बारस्कर म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांचे लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु लसीकरणाचा येणारा साठा व आरोग्य केंद्रावर होणारी नागरिकांची मोठी गर्दी त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे.
यासाठी आम्ही आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा करून मंगल कार्यालयात लसीकरण केंद्रे सुरू करावी अशी मागणी केल्यानंतर आमदार जगताप यांनी ताबडतोब प्रशासनाची संवाद साधून व प्रशासनाला सूचना देऊन
मंगल कार्यालयांमध्ये पावसाळ्यापूर्वी लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी केल्यानंतर आज संपूर्ण नगरमध्ये मंगल कार्यालयांत लसीकरण सुरू झाले.