एकही गाव विकासापासून वंचित राहणार नाही : आमदार नीलेश लंके

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- विकास कामांपासून मतदारसंघातील एकही गाव वंचित राहणार नाही.विकासाच्या बाबतीत पारनेर-नगर मतदारसंघ एक आदर्श मतदारसंघ म्हणून राज्यात ओळखला जाईल, अशी ग्वाही आमदार नीलेश लंके यांनी दिली.

तालुक्यातील चोंभूत येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार लंके बोलत होते. समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर, माजी आमदार पोपटराव गावडे, बाजार समितीचे माजी उपसभापती गंगाधर शेळके, अशोक सावंत,

बाबाजी भंडारी, राजश्री कोठावळे, अनिल गंधाक्ते आदी उपस्थित होते. एक कोटी रुपये खर्च करून भाळवणी, चोंभूत ते नगर जिल्हा हद्द रस्त्याची दुरुस्ती,

जमदाडे मळा अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण, खुली व्यायाम शाळा, चोंभूत गावठाण रस्ता, पथदिवे, स्मशानभूमी सुशोभीकरण,

जमदाडे मळा अंगणवाडी संरक्षण भिंत, ठणकवस्ती समाज मंदिर असे एकूण १ कोटी ३३ लाख ५० हजार रुपये खर्चाच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.