Sweden:स्वीडनमधील प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्वांते पाबो यांना मेडिसीन क्षेत्रातील संशोधनासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. परंतु त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्वांतेंना काही लोकांनी उचलून तलावात फेकल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सुरवातीला अनेकांचा आश्चर्य वाटत आहे. मात्र, नंतर उलगडा होता की, स्वीडनमध्ये एखाद्या व्यक्तीने पीएचडी पूर्ण केली की त्याला उचलून पाण्यात फेकले जाते.
येथे स्वांते यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्यावर आपल्याला पाण्यात फेकण्यात यावे, अशी त्यांचीच इच्छा होती. त्यामुळे लोकांनी त्यांना तळ्यात फेकले.
त्यांना पाण्यात फेकल्यावर सर्वांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर त्यांच्यासाठी लाइफ जॅकेट सोडण्यात आले. म्हणजे काय तर तेथील प्रथेनुसार या महान शास्त्रज्ञाला पाण्यात फेकण्यात आले आहे. याचा उलगडा त्याखालील कॉमेंटस वाचल्यानंतर होतो.