सत्ता कुणाची हे पाहात नाही : आमदार काळे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- कोपरगाव तालुक्यातील अंचलगाव, ओगदी ही तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील गावे माझ्यासाठी तेवढीच महत्वाची आहेत.

अंचलगावसह परिसरातील गावांच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावू, कोणत्या गावात सत्ता कुणाची आहे, हे पाहात नाही.

आपण मतदारसंघातील नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून विकासकामे करीत आहोत, असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

आंचलगाव येथील एका कार्यक्रमात आमदार काळे बोलत होते. ते म्हणाले की, मागील वर्षी आलेले कोरोना संकट वर्षअखेरीस उतरणीला लागले होते.

मात्र फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना संकटाने पुन्हा डोके वर काढले असून एकून परिस्थिती पाहता हे संकट काहीसे घातक असल्याचे दिसत आहे.

साहजिकच पुन्हा एकदा आपणा सर्वांची जबाबदारी वाढली आहे. त्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी.

मास्क, सामाजिक अंतर व सॅनिटायझरचा वापर करून किंवा साबणाने आपले हात वारंवार धुवून आपली आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.

यावेळी अर्जुन काळे, कारभारी आगवन, संजय आगवन, गणेश गायकवाड, सरपंच अलकाताई लालचंद जाधव, उपसरपंच सोमनाथ जाखु जोरवर,

सरपंच मंगलताई भाऊसाहेब खिरडकर, उपसरपंच लिलाबाई फकीरराव शिंदे, ग्रामसेवक बी. के. बागुल, ग्रामसेवक रफिक सय्यद यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24