Nokia C32 : सर्वात आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी नोकिया आणखी एक स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. अनेक दिवसांपासून कंपनी या फोनवर काम करत आहे. लवकरच ही कंपनी Nokia C32 हा फोन लाँच करणार आहे.
जर तुम्ही कमी किमतीत स्मार्टफोनच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हा फोन सर्वोत्तम पर्याय आहे. कारण या फोनची किंमत 10 हजारांपेक्षा कमी आहे. हा फोन 50MP कॅमेरा आणि शक्तिशाली बॅटरीने सुसज्ज असणार आहे.
या दिवशी देशात लॉन्च होणार नोकिया C32
रिपोर्टनुसार, कंपनीचा आगामी नोकिया C32 स्मार्टफोन 23 मे रोजी भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. परंतु कंपनीकडून अजूनही याबाबत अधिकृतपणे खुलासा करण्यात आला नाही.
जाणून घ्या किंमत
Nokia C32 हा एक कंपनीचा एक बजेट स्मार्टफोन आहे. लीक झालेल्या रिपोर्टवर विश्वास ठेवायचा झाल्यास हा फोन भारतात 9,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च केला जाईल. इतकेच नाही तर, नोकिया C32 साठी 1 वर्ष विनामूल्य बदलण्याची ऑफर देण्यात येत आहे.
Nokia C32 चा 3GB + 64GB व्हेरिएंट बार्सिलोना येथे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) मध्ये EUR 129 (अंदाजे रु. 12,187) मध्ये लॉन्च केला आहे. आगामी फोन तुम्हाला बीच पिंक, चारकोल आणि ऑटम ग्रीन या तीन रंगांमध्ये लॉन्च करू शकते.
जाणून घ्या स्पेसिफिकेशन
डिस्प्ले: 6.5 इंच IPS HD LCD डिस्प्ले.
मागील कॅमेरा: LED फ्लॅशसह 50MP+2MP कॅमेरा.
सेल्फी कॅमेरा: 8MP
चिपसेट: Unisoc SC9863A
स्टोरेज: 3GB RAM/ 4GB RAM आणि 64GB/128GB अंतर्गत स्टोरेज (मायक्रोएसडी कार्डद्वारे 256GB पर्यंत वाढवता येऊ शकते)
OS: Android 13
बॅटरी: 5,000mAh; 3 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देईल असा दावा कंपनी करत आहे.