अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :- कंपनीने Nokia 2760 Flip फीचर फोनला लाँच केले असून, याचे डिझाइन अगदी जुन्या क्लासिक मॉडेल सारखे आहे. नावावरूनच हा फ्लिप फोन असल्याचे लक्षात येते. आता कंपनीने फोनला खूपच कमी किंमतीत लाँच केले आहे.
फोनची प्रमुख वैशिष्ट्ये
यामध्ये २.८ इंच डिस्प्ले दिला आहे.
फोटोग्राफीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.
Nokia 2760 Flip फोनची किंमत जवळपास १,४४३ रुपये आहे.
स्पेसिफिकेशन्स
Nokia 2760 Flip फीचर फोन सिंगल ब्लॅक रंगात येतो.
नोकिया २७६० फ्लिप फोनमध्ये २.८३ इंच इंटर्नल एलसीडी डिस्प्ले दिला आहे.
तर बाहेरील बाजूला १.७७ इंच डिस्प्ले मिळतो.
हा फोन १.३GHz क्वाड-कोर प्रोसेसर सपोर्टसह येतो.
यात कंपनीने ४ जीबी स्टोरेज दिले आहे.
यात कॅलक्यूलेटर, अलार्म इत्यादी उपयोगी अॅप्स दिले आहेत.
कॅमेरा आणि बॅटरी
नोकियाचा हा फोन सिंगल चार्जमध्ये ३.८ तास टॉकटाइम आणि १८ दिवसांच्या स्टँडबाय टाइमसह येतो. डिव्हाइसमध्ये कीपॅडवर बटन देखील दिले आहेत. यामुळे वृद्धांना फोन वापरण्यास सोपे जाईल.