Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Nokia Maze 5G Smartphone : Oneplus ला टक्कर देणार नोकियाचा आगामी पॉवरफुल स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

भारतीय टेक बाजारात आता नोकिया आपला नवीन दमदार फीचर्स आणि कॅमेरा असणारा स्मार्टफोन घेऊन येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा Oneplus ला टक्कर देईल.

Nokia Maze 5G Smartphone : सध्या भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वापरकर्ते आता दमदार फीचर्स आणि कॅमेरा असणारा स्मार्टफोन वापरणे पसंत करत आहेत. त्यामुळे त्यांची ही मागणी लक्षात घेता अनेक कंपन्या मार्केटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्टफोन घेऊन येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच आता देशातील सर्वात जुनी कंपनी नोकिया आपला नवीन स्मार्टफोन घेऊन येत आहे. लाँच झाल्यानंतर कंपनीचा हा फोन सर्वात आघाडीची टेक कंपनी Oneplus ला टक्कर देणार आहे. यात कंपनी कोणते फीचर्स आणि स्पेसिफिकेशन देईल? जाणून घ्या.

कंपनीच्या नवीन स्मार्टफोनचे नाव Nokia Maze 5G आहे. आपल्या ग्राहकांना विचारात घेता कंपनीने हा स्मार्टफोन लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्ससह 7800mAh ची मजबूत बॅटरी देण्यात आली आहे. यात मजबूत दर्जाचा 108 मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध आहे. कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये बॅटरी बॅकअप आणि कॅमेरा चांगला मिळत आहे.

जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि तपशील

कंपनीकडून आपल्या ग्राहकांसाठी यात 4K रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तर डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7 प्रोटेक्शन दिले आहे. याच्या प्रोसेसर बद्दल बोलायचे झाल्यास यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

कंपनीच्या या जबरदस्त स्मार्टफोनच्या रॅम आणि अंतर्गत स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर तो 8GB / 12GB रॅम आणि 128GB / 256GB अंतर्गत स्टोरेज पर्यायासह उपलब्ध करून देण्यात आला आहे. तुम्हाला हवे असेल तर मायक्रोएसडी कार्डद्वारे 512GB किंवा 1TB पर्यंत स्टोरेज वाढवू शकता.

कसा असणार कॅमेरा

या स्मार्टफोनमधील कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास यात मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यात 108MP प्राथमिक लेन्स आणि तीन इतर 32MP + 16MP + 5MP कॅमेरा सेन्सर उपलब्ध असणार आहेत. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 48MP फ्रंट कॅमेरा लेन्स दिला आहे.

मिळणार 7800mAh ची मजबूत बॅटरी

यात पॉवर बॅकअपसाठी जलद चार्जिंग सपोर्टसह 7800mAh ची मजबूत बॅटरी उपलब्ध असणार आहे. त्याचा बॅटरी बॅकअप खूप चांगला असून त्यात कनेक्टिव्हिटीसाठी 5G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ, GPRS यांसारख्या अनेक गोष्टी दिल्या आहेत.