अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-उत्तर मध्य रेल्वेने उत्तर प्रदेशातील झांसी येथे विविध ट्रेड्स मध्ये अप्रेंटिस पदांच्या एकूण 480 पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे.
या रिक्रूटमेंट ड्राइवद्वारे उत्तर मध्य रेल्वेमध्ये फिटर, वेलडर, मेकॅनिक, कारपेंटर आणि इलेक्ट्रिशियन अशी एकूण 480 पदे नियुक्त केली जातील. इच्छुक उमेदवार या पदांसाठी 16 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात.
पद संख्या- 480
योग्यता :- या अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यासह संबंधित ट्रेड मध्ये ITI सर्टिफिकेट असावे.
वयोमर्यादा :- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे निश्चित केले गेले आहे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात येईल.
एप्लीकेशन फीस
निवड प्रक्रिया :- या पदांसाठी कोणत्याही लेखी परीक्षा आणि मुलाखतीची गरज नाही. यासाठी उमेदवारांची निवड दहावीच्या गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.
आवश्यक तारखा
अर्ज कसा करावा ?:- या पोस्टसाठी उमेदवार mponline.gov.in या पोर्टलद्वारे नोंदणी करू शकतात. कृपया अर्जापूर्वी उमेदवारांची सूचना वाचा. अर्जात चूक असल्यास ते नाकारले जाऊ शकते.