डबल नाही तिप्पट झाला पैसा ! SIP द्वारे लाखो रुपये कमवण्यासाठी ‘हे’ आहेत बेस्ट मिडकॅप म्युच्युअल फंड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या पैसे कमावणे व कमावलेला पैसे गुंतवणे हे तरुणांसमोर ध्येय असते. याचे कारण असे की, आजची गुंतवणूक ही तरुणांना भविष्यात उपयोगी ठरणार आहे. गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत. परंतु सध्या तरुण वर्ग इक्विटी म्युच्युअल फंडांकडे जास्त वळला आहे. याचे कारण असे की शेअर मार्केटमध्ये थेट गुंतवणूक करणे जोखमीचे आहे. त्यामुळे लोक सध्या इक्विटी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून बाजारात पैसे गुंतवतात.

यातही आता सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात SIP अधिक लोकप्रिय पर्याय बनला आहे. इक्विटी फंडमध्ये रिस्क नसते असे अजिबात नाही, फक्त विषय एकच आहे की, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकाच स्टॉकऐवजी अनेक वेगवेगळ्या मजबूत स्टॉक्समध्ये पैसे गुंतवले जातात.

यामुळे गुंतवणुकीत व्हेरिएशन येते व आपली गुंतवणूक बऱ्याच अंशी रिस्क फ्री होते. तुम्हीही याच अशाच काही पर्यायांच्या शोधात असाल तर मिडकॅप म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय असू शकतो. असे काही फंड आहेत की ज्यांनी जवळपास तीनपट रिटर्न दिले आहेत.

मिडकॅप म्युच्युअल फंड विषयी थोडेसे 

मिडकॅप म्युच्युअल फंड नेमके काय करते तर ते गुंतवणूकदारांने जो पैसे गुंतवला आहे त्यामधील मोठा भाग मिडकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवते. ज्या कंपन्यांचे बाजार भांडवल मिडीयम असते अशा कंपन्या म्हणजे मिड कॅप कंपन्या. या कंपन्यांचे मार्केट कॅप साधणार 5000 कोटी ते 20,000 कोटी रुपयांपर्यंत असते. म्हणजेच यांच्या विस्ताराच्या अनेक संधी असतात. त्यामुळे यात केलेली गुंतवणूक शक्यतो तरी प्लसमध्ये रिटर्न देते.

आता आपण सर्वाधिक रिटर्न देणाऱ्या काही मिडकॅप फंड बद्दल माहिती पाहुयात 

पाच वर्षात जबरदस्त रिटर्न देणाऱ्या कंपन्यांमध्ये Quant Mid Cap: 27%, PGIM Ind Midcap: 25%, Motilal Oswal Midcap: 24.61%, Nippon Ind Growth: 23.58% या फंडांचा समावेश होतो. या सोबतच आणखी पाहिले तर Edelweiss Mid Cap: 23.52%, Mahindra Manulife Mid Cap: 23%, Kotak Emrgng Eqt: 22.79%, HDFC Mid-Cap: 22.46%, SBI Magnum Midcap: 22.44%, Tata Midcap Growth: 22% हे देखील मिडकॅप फंड आहेत की ज्यांनी जबरदस्त रिटर्न दिलेला आहे.

एकंदरीत जर यावर नजर टाकली तर 5 वर्षात साधारण 27 टक्के पेक्षा जास्त रिटर्न मिळाला आहे. म्हणजेच जर एखाद्याने 1 लाख रुपयांची गुंतवणूक केलेली असती तर त्याचे पैसे पाच वर्षात साधारण सव्वा तीन लखपर्यंत गेलेला असता.

मिडकॅप फंड मध्ये गुंतवणूक करताना हे पण ध्यानात घ्या 

यात गुंतवणूक करायची ठरवली तर काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. यामध्ये सर्वात महत्वाचे त्या फंडाची दीर्घकालीन कामगिरी लक्षात घ्या. तसेच तुमची गुंतवणूक दीर्घकालीन ठेवा. कंपनीचा एक्स्पेन्शन रेश्‍योपण लक्षात ठेवा. रिस्‍क प्रोफाइल व फंड मॅनेजरचा एक्स्पर्टपणा हे देखील लक्षात घ्या. याच गोष्टी तुमच्या गुंतवणुयुकीची रिस्क कमी करेल. व तुम्हाला एक मोठा फंड उभा करण्यात तुमची मदत करेल.