व्हेंटिलेटर तर नाहीच, ऑक्सिजन बेड मिळणेही अशक्य! जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :- साहेब काही तरी करा पण आम्हाला बेड उपलब्ध करून घ्या. तुमच्या ज्या काही अटी असतील त्या सर्व आम्हाला मान्य आहेत. आज नगर येथील अनेक हॉस्पिटलमध्ये असे विनंती करणारे कोरोना बाधित रुग्णाचे नातेवाईक दिसत आहेत.

एकूणच जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली असून, जिल्ह्यातील गंभीर कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर मिळणे तर जवळपास दुरपास्त झाले आहे. शासकीय किंवा खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडही मिळेनासे झाले आहेत.

जिल्ह्यात रुग्णांना गत आठवड्यापासूनच ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, आता तर शासकीयच नव्हे, खासगी रुग्णालयांमध्ये देखील ऑक्सिजन बेड मिळणे जवळपास दुरपास्त झाले आहे.

हे पाहता जिल्हा प्रशासनाने नियंत्रण संपर्क क्रमांक जाहीर केला परंतु सदर क्रमांका वर फोन केला असता एक वेबसाइट दिली जाती.

ती सर्च केली असता ‘त्या’ हॉस्पिटलने ती अपडेट केली नसल्यामुळे तेथील रिक्त बेड ची माहिती मिळत नाही.

दिवसभरात अनेक हॉस्पिटलला फोन लावूनही एकाही ठिकाणी बेड रिक्त असल्याचा दिलासा कुणाकडूनही मिळत नाही.

जोपर्यंत एखादा रुग्ण बरा होऊन घरी जात नाही किंवा कुणाचे निधन होत नाही, तोपर्यंत त्या रुग्णालयातील बेड अन्य कुणाला मिळू शकत नाही, अशी परिस्थिती कायम आहे.

रुग्णांना प्रचंड ओळखपाळख काढून किंवा रुग्णालयांच्या सर्व अटी मान्य करीत रुग्णाला दाखल करून घेण्यावाचून संबंधितांच्या कुटुंबीयांसमोर कोणताही मार्ग उरलेला नसल्याने रुग्ण आणि कुटुंबीय सर्व रुग्णालयांकडे अक्षरश:

गयावया करीत ऑक्सिजन बेडची मागणी करीत असल्याची सध्याची शहर व जिल्हातील परिस्थिति आहे.एकं दरच जिल्ह्याची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24