Nothing Phone (1) चा फोटो आला समोर; “या” दिवशी होणार लॉन्च; जाणून घ्या रिसायकल वस्तूंपासून बनवलेल्या फोनबद्दल सर्वकाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nothing Phone : Nothing Phone (1) स्मार्टफोन लॉन्च होण्यासाठी काही दिवसच शिल्लक आहेत. Nothing चा पहिला स्मार्टफोन लॉन्च होण्याआधी, फोनच्या वैशिष्ट्यांबद्दलची माहिती समोर आली आहे. लॉन्चच्या काही दिवस अगोदर, नथिंग फोन (1) च्या रिटेल बॉक्सचे व्हिडिओ आणि अनबॉक्सिंग फोटो समोर आले आहेत.

व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या फोनचा रिटेल बॉक्स खूपच स्लिम आहे. तसेच मिळलेल्या माहितीनुसार या फोनसोबत खरेदीदारांना बॉक्समध्ये चार्जर मिळणार नाही. नथिंग फोन (1) चा एक अनबॉक्सिंग फोटो देखील समोर आला आहे, ज्यामध्ये चार्जर दिसत नाही. याआधी नथिंग फोन (1) सह 33W फास्ट चार्जिंग सोल्यूशन मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते.

यासोबतच आणखी एक व्हिडिओ जो टिकटॉकवर नथिंगने पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की,नथिंग फोन (1) मध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. हे खूपच पटकन कार्य करते. नथिंगचा पहिला स्मार्टफोन फोन (1) 12 जुलै रोजी लॉन्च होईल. नथिंग ब्रँडचा हा फोन भारतात फ्लिपकार्ट आणि रिलायन्स डिजिटल वरून खरेदी करता येणार आहे.

YouTuber गौरव चौधरी उर्फ ​​टेक्निकल गुरुजी याने आगामी नथिंग फोन (1) च्या रिटेल बॉक्सची झलक दाखवणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. चांगल्या भविष्यासाठी नथिंग ब्रँडने फोनचा रिटेल बॉक्स रिसायकल मटेरियल आणि शून्य प्लास्टिकने कसा बनवला आहे हे या व्हिडिओद्वारे सांगण्यात आले आहे. यासोबतच या फोनच्या बॉक्समध्ये प्रिंटसाठी रासायनिक शाईऐवजी सोयाबीन शाईचा वापर करण्यात आला आहे. फोनचा स्लिम बॉक्स पाहिल्यानंतर असा अंदाज लावला जात आहे की कंपनी या फोनसोबत चार्जर देणार नाही. याशिवाय, नथिंग फोन (1) रिसायकल केलेले अॅल्युमिनियम आणि रिसायकल प्लास्टिक वापरून बनवण्यात आले आहे.

तसेच नथिंग फोन (1) स्मार्टफोनचा अनबॉक्सिंग फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये, नथिंग फोन (1) च्या रिटेल बॉक्समध्ये एक पारदर्शक TPU कवर दिसू शकतो. लीक झालेल्या फोटोत नथिंग फोन (1) पांढऱ्या रंगाचा आहे.

https://twitter.com/floozz3/status/1544729048605155329?s=20&t=gNy1UGJk6B-_BqaxbG_Kxw

Nothing Phone (1) ब्रँडचा पहिला स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरसह लॉन्च केला जाईल. कंपनीने पुष्टी केली आहे की फोनचा फ्रंट कॅमेरा 50MP Sony IMX766 सेंसर असेल जो OIS ला सपोर्ट करेल. यासोबतच फोनचा बॅक कॅमेरा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स असेल. नथिंग फोन (1) स्मार्टफोन 33W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो. तथापि, नथिंग फोन (1) च्या रिटेल बॉक्समध्ये चार्जरचा समावेश केला जाईल की नाही हे स्पष्ट नाही. Nothing Phone (1) स्मार्टफोन Android 12 वर आधारित कंपनीच्या कस्टम यूजर इंटरफेसवर चालेल.