डोनाल्ड ट्रम्प यांच्या हायप्रोफाईल दौऱ्यामुळे झोपडपट्टीवासीयांना नोटीस

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे येत्या सोमवारपासून भारत दौऱ्यावर येत असून, ते गुजरातच्या अहमदाबाद शहराला भेट देणार आहेत.

या पार्श्वभूमीवर, शहरातील नवनिर्मित मोटेरा स्टेडियमजवळच्या झोपडपट्टी भागात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना घरे रिक्त करण्यासाठी महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे. त्यावर स्थानिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

आमच्या निवासाची पर्यायी व्यवस्था करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हायप्रोफाईल दौऱ्यामुळे अहमदाबादमधील झोपडपट्टी भागात संरक्षण कवच भिंत बांधण्यात येत आहे.

ज्या मार्गावरून ट्रम्प जाणार आहेत, तेथील झोपड्या दिसू नयेत म्हणून हे पाऊल उचलले जात आहे. देशाच्या राजकारणात हा मुद्दा चांगलाच चर्चिला जात असतानाच आता झोपडपट्टीतील ४५ कुटुंबीयांना घरे खाली करण्यासाठी स्थानिक महापालिकेने नोटीस बजावली आहे.

या नोटिसीत ट्रम्प यांच्या दौऱ्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तुम्ही झोपडपट्टीधारकांनी मनपाच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे आपल्या सामानासह स्वत:चे घरे रिक्त करण्यात यावीत, अन्यथा प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येईल, असे नोटिसीत बजावण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24