Gold Price Update : भारीच की! आता 10 ग्रॅम सोने 31804 रुपयांना खरेदी करता येणार

Gold Price Update : जागतिक संकेत आणि रुपयामधील कमकुवतपणामुळे सोने-चांदीच्या किमती बदलत असतात. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

कारण आता तुम्ही स्वस्तात सोने खरेदी करू शकता. लग्नसराईच्या हंगामात स्वस्तात सोने आणि चांदी खरेदी करण्याची संधी गमावू नका. जाणून घेऊयात सोने-चांदीच्या किमती.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आज जाहीर होणार किमती

आजपासून नवीन व्यावसायिक सप्ताह सुरू होत असून शेवटच्या व्यापारी आठवड्यात सराफा बाजारात सोन्यासोबतच चांदीच्या दरातही वाढ झाली होती. आज नव्या व्यावसायिक आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीची वाटचाल कशी होते याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.

शुक्रवारी होता हा दर

व्यापारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, सोने 54366 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 67822 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

नवीनतम दर

शुक्रवारी 24 कॅरेट सोने 333 रुपयांनी स्वस्त होऊन 54,366 रुपये, 23 कॅरेट सोने 332 रुपयांनी स्वस्त होऊन 54,148 रुपये, 22 कॅरेट सोने 305 रुपयांनी स्वस्त होऊन 49,799 रुपये आणि 18 कॅरेट सोने 305 रुपयांनी स्वस्त होऊन ते 40,775 रुपये आणि 14 कॅरेट सोने 195 रुपये स्वस्त होऊन 31,804 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला.

सोने 1800 रुपयांनी तर चांदी 12000 रुपयांनी स्वस्त

आनंदाची बातमी म्हणजे सोने सध्या 1834 रुपयांनी प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. तेव्हा सोने 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेले होते. दुसरीकडे, चांदी 12158 रुपये प्रति किलो या सर्वोच्च पातळीपेक्षा स्वस्त होऊन चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो आहे.

करू नका दिरंगाई

जाणकारांच्या मते, खरमासानंतर 14 जानेवारीला मकर संक्रातीसह लग्नसराईला अजून बराच अवधी बाकी आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या भावातील वाढीचा टप्पा आगामी काळातही कायम राहणार आहे. या लोकांचे असे मत आहे की नवीन वर्ष 2023 मध्ये लवकरच सोन्याची किंमत सर्वोच्च पातळीच्या जवळ किंवा त्यापलीकडे पोहोचेल. त्यामुळे तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर लवकरात लवकर खरेदी करा.

मिस्ड कॉल देऊनही जाणून घ्या किंमत

तुम्ही आता 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. सततच्या अपडेट्ससाठी http://www.ibja.co किंवा http://ibjarates.com या वेबसाइटला भेट देऊ शकता.

अशी जाणून घ्या शुद्धता

तुम्ही आता सोन्याची शुद्धता बीआयएस केअर या सरकारी अॅपद्वारे तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी निगडित तक्रारही करू शकता.