आता ‘त्या’गावावर राहणार सीसीटीव्हीची नजर!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- सुमारे वीस वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला कोठेवाडी येथील दरोडा व सामूहिक अत्याचार प्रकरणातील काही आरोपींना मोक्का कलमाच्या शिक्षेतून न्यायलायाने मुक्त केले आहे.

या पार्श्वभूमीवर कोठेवाडी व माणिकदौंडी परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर पाथर्डी-शेवगावच्या आ.मोनिका राजळे यांनी काल कोठेवाडी येथील ग्रामस्थ व महिलांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

यावेळी आ.राजळे यांनी सांगितले की,गावातील ग्रामस्थांनी भीती बाळगू नका, घाबरू नका,महसूल प्रशासन, पोलीस दल, लोकप्रतिनिधी तुमच्या सोबत आहेत.

तुमच्या सुरक्षिततेसाठी ज्या ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे, त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू. ग्रामस्थांनी प्रशासन व पोलीस दलास सहकार्य करावे.

वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून तुमच्या सरंक्षणासाठी कायम पोलीस चौकी, हायमॅक्स लाईट, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे कामी कार्यवाही करण्यास लावू. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या अडीअडचणी सांगून त्या सोडविण्याची मागणी केली.

दरम्यान पोलिस अधीक्षक पाटील यांनी देखील या गावाला भेट देऊन येथील नागरिकांना धीर दिला आहे. सध्या या गावात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24