अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-जिल्ह्यात प्रत्येक दिवसागणिक कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. सरकारने संचारबंदी, कठोर निर्बंध यासारख्या उपाययोजना केल्या आहेत.
मात्र तरीदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव काही कमी होते नाही. एकीकडे प्रशासन गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात दुसरीकडे मात्र भाजीपाला खेरदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.
त्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाययोजना आणखी कडक करत प्रशासनाने अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केटयार्ड, सारसनगर, अहमदनगर येथील सर्व व्यवसायिक दुकाने, भाजीपाला व फळे विक्रेते यांचे दुकाने दि.१५ मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
तसेच सदरचे व्यवसायिक दुकाने व भाजीपाला व फळे विक्रेत्यांची दुकाने हे कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर उपबाजार आवार नेप्ती,
अहमदनगर येथे सुरु करण्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी जारी केले आहेत.