आता हव्या त्या वितरकाकडून घ्या गॅस सिलेंडर!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :-आता ग्राहकांना हव्या त्या वितरकाकडू LPG गॅस सिलेंडर घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकार आणि पेट्रोलियम मंत्रालयाकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहे.

सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये या सुविधेची चाचपणी केली जाणार आहे.

त्यात पुण्याचा समावेश आहे. त्यामुळे पुणेकरांना लवकरच हव्या त्या वितरकाकडून LPG गॅस सिलेंडर भरून घेता येणार आहे. गेल्या वर्षभरापासून देशात निर्माण झालेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे अनेक कंपन्यांनी ऑनलाईन किंवा मोबाईलवर सिलेंडर बुक करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

इंडेन, एचपी आणि भारत पेट्रोलियम या प्रमुख कंपन्यांचे LPG गॅस सिलेंडर उपलब्ध आहेत. त्यानुसार मोबाईल अॅप किंवा ऑनलाईन वेबसाईटवरून सिलेंडर बुकिंग करताना ग्राहकांना त्यांच्या परिसरात सेवा देणाऱ्या डिलिव्हरी डिस्ट्रिब्युटर्सची अर्थात वितरकांची यादी दाखवली जाईल.

त्यामधून ग्राहकांना हवा तो पर्याय निवडण्याची सुविधा असेल. पेट्रोलियम मंत्रालयाच्या निर्णयानुसार देशातील काही शहरांमध्ये ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला उपलब्ध होणार असून त्याच्या निष्कर्षांनंतर व्यापर स्तरावर देशभरात या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.

सध्या एचपी, भारत पेट्रोलियम आणि इंडेन या कंपन्यांचे गॅस सिलेंडर वापरासाठी उपलब्ध आहेत. मात्र, हे सिलेंडर वितरीत करण्यासाठी स्थानिक पातळीवर वितरकांना एजन्सी दिली जाते. मात्र, आता आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या कोणत्याही वितरकाकडून आपण संबंधित कंपनीचा गॅस सिलेंडर घेऊ शकतो.

अहमदनगर लाईव्ह 24